Ad will apear here
Next
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज
बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर घडणाऱ्या संस्कारातून मोठेपणी त्याचे व्यक्तिमत्त्व तयार होते. व्यक्तिमत्त्व विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असूनही ती कशी घडते हे आपल्याला कळत नाही. हा विकास कसा घडत जातो, व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या सर्व संकल्पना विनोद बिडवाईक यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज’मधून सोप्या भाषेत समजवून दिल्या आहेत.

व्यक्तिमत्त्वातल्या सर्व गुण-दोष प्रवृत्तीचा, स्वभावाचा अभ्यास करून सर्वव्यापी साधणे म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया, अशी व्याख्या लेखकाने केली आहे. व्यक्तिमत्त्व विकासात बदलाला महत्त्व असल्याने प्रथम आपल्या मनाची तयारी हवी. नकारात्मकतेला स्थान न देता आपल्यातील गुण-दोष, स्वभाव ओळखून त्याला सकारात्मक वळण दिल्याने आपण यशाची फळे आनंदाने चाखू शकतो.

आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहोत या भावनेतून घडत जाणारे व्यक्तिमत्त्व, व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आरोग्याचे महत्त्व, संवाद साधण्याची पद्धत, अंतर्मुख व बहिर्मुख व्यक्तिमत्त्व, निर्णयक्षमता, माणसे सांभाळण्याची कला अशा विविध मुद्द्यांची चर्चा करीत एखाद्यामधील वेगवेगळ्या पैलूंतून कसदार व्यक्तिमत्त्व कसे उमलून येऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले आहे.       

प्रकाशक : बोहोसोल पब्लिकेशन
पाने : १२१
किंमत : १७५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZNNBT
Similar Posts
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज व्यक्तिमत्त्व विकास हा आधुनिक काळातील परवलीचा शब्द आहे. व्यक्तिमत्त्व विकास हा यशाकडे जाण्याचा एक मार्गही आहे. त्यामुळे विनोद बिडवाईक यांचे हे पुस्तक त्या दृष्टीने मार्गदर्शन करते. एखाद्याचे अनुकरण करणे म्हणजे व्यक्तिमत्व सुधारणे नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. व्यक्तिमत्त्वाचे एकूण चार भाग पाडलेले आहेत,
स्वत:चं मूल्यमापन ‘स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा’ हे विनोद बिडवाईक यांनी लिहिलेले पुस्तक व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करते. प्रत्येकाला स्वतःची ओळख होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा यशाकडे जाण्याचा मार्ग खडतर असू शकतो मात्र अशक्य नसतो. यश मिळवण्यासाठी काय करायला हवे, या प्रश्नाचे उत्तर स्वयंविकास हे आहे. स्वयंविकास म्हणजे काय आणि तो कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर विनोद बिडवाईक यांच्या या पुस्तकात मिळते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि कमतरता ओळखून त्यानुसार विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language